श्रीरामपूर : ईपीएस ९५ अतर्गतच्या पेन्शनधारकांच्या पेन्शवाढीच्या मागणीसंदर्भात राष्टिय संघर्ष समितीला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन क्षेञिय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे आयुक्त श्री.अतुल कोतकर यांनी दिली. श्री.कोतकर क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालय, नाशिक येथे नव्यानेच रुजू झाले आहेत.त्यांचा राष्ट्रीय संघर्ष समितीचे. वतीने पश्चिम भारत क्षेत्र संघटक श्री सुभाषराव पोखरकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री देविसिंग अण्णा जाधव आदिंनी सत्कार केला.तसेच त्यांना श्रममंत्री डॉ.मनसुक मांडविया यांना द्यावयाचे निवेदन सादर केले.सदर निवेदनात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचेकडे ईपीएस ९५ अंतर्गतच्या निवृत्तीधारकांना दरमहा रु.७५०० अधिक महागाई भत्ता याप्रमाणे निवृत्तीवेतनाचा प्रश्न सध्या सुरु असलेल्या संसदेच्या अधिवेशानात मार्गी लावण्याची मागणी केली आहे.या निवेदनाची प्रत गृहमंञी अमित शहा,अर्थमंञी निर्मला सितारामन यांना देण्यात आली आहे. याप्रसंगी नाशिक जिल्हा सचिव श्री विठ्ठलराव सोनवणे, संघटक श्री पुंडलिकराव भांबरे उपस्थित होते.यावेळी आयुक्तांनी राष्ट्रिय संघर्ष समितीला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
ईपीएस ९५ अंतर्गतच्या पेन्शनधारकांना सर्वोतोपरी सहकार्यःअतुल कोतकर







