शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

मातापूरच्या कन्येची मुंबई पोलीस दलात निवड

---Advertisement---

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर येथील रवींद्र भाऊसाहेब दौंड यांची कन्या साक्षी दौंड हिची महाराष्ट्र पोलीस दलांतर्गत मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे.अत्यंत सामान्य परिस्थितीतून पुढे येत साक्षीने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावर हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, कुटुंबीयांचा त्याग आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन यांचा मोलाचा वाटा असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अनेक अडचणींवर मात करत कुटुंबाने तिच्या शिक्षणाला आणि स्वप्नांना कायम पाठबळ दिले. त्याच बळावर साक्षीने पोलीस सेवेत प्रवेश मिळवत कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.तिच्या निवडीबद्दल मातापूर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून तिचा सत्कार केला. साक्षी ही येथील उद्योजक सौरव दौंड यांची भगिनी असून, तिच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment