शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

महेश नागरी सहकारी पतसंस्थेला ४.४४ कोटींचा निव्वळ नफा

---Advertisement---
  • महाराष्ट्रात नंबर एक पतसस्था बनवणार चेअरमन मंचकराव पाटील

शिरुर ताजबंद : महेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिरुर ताजबंद ता. अहमदपूर (जि. लातूर) पतसंस्थेने गरुड भरारी घेत आपला प्रगतीचा आलेख कायम राखत मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. पतसस्थेने ४ कोटी ४४ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून शिस्तबद्ध नियोजनामुळे पतसंस्थेचा ‘नेट एनपीए’ मागील वर्षा पेक्षा दोन टक्यांनी कमी झाला असुन महेश नागरी पतसंस्थेला महाराष्ट्रात नंबर एकची पतसंस्था बनवणार असल्याचे पतसस्था चेअरमन मंचकराव पाटील यांनी सागीतले.
चेअरमन पाटील यांनी पतसंस्थेच्या प्रगतीची माहिती देताना सांगीतले की पतसंस्थेची वाटचाल माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात मार्च २०२६ अखेर मागील वर्षापेक्षा पतसंस्थेच्या ठेवीत २५५५.३० लाख रुपयाने वाढ होवून १७० कोटी ७६ लाख २३ हजार रुपयावर पोहंचल्या आहेत यावरुन पतसंस्था सदस्यांचा सचालक मंडळ व बँकेचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर असलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. चालू आर्थिक वर्षात ११५ कोटी ५८ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सहकार खात्याच्या नियमांचे काटेकोर पालन करत पतसस्थेने आपला विश्वासार्हता जपली आहे.
पतसंस्थेची प्रगती पाहून माजी मंत्री बाळासाहेब जाधव व राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आनंद व्यक्त करुन पतसंस्था चेअरमन मंचकराव पाटील,उपाध्यक्ष बाबुराव सैदापूरे,सचिव आर.एन.वलसे , संचालक मंडळ, व्यवस्थापन, अधिकारी, कर्मचारी आणि पिग्मी एजंट यांनी वसुलीचे धोरण अत्यंत प्रभावीपणे राबवल्यामुळेच हे यश शक्य झाले आहे असे सहकार मंत्री पाटील यांनी सांगीतले.
माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी महेश नागरी पतसंस्था ही ग्रामीण भागातील शेतकरी,मजूर व छोटे व्यापारी यांचा आधार बनत चालली असून पतसंस्थेने केवळ नफा कमावणे हा उद्देश ठेवला नाही तर तळागाळातील सामान्य आणि गरजू व्यक्तींना आर्थिक मदत करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे यात पतसंस्था चेअरमन ,उपचेअरमन ,सचिव ,संचालक मंडळ अधिकारी ,कर्मचारी यांनी परिश्रम घेतल्याने पतसस्थेच्या ठेवी ,नफा वाढल्या असल्याचे माजी मंत्री जाधव यांनी सांगीतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment