श्रीरामपूर : अशोकनगर येथील रामराव आदिक पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण, समता व मानवतेचे दीपस्तंभ महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांना अभिवादन केले.
याप्रसंगी महात्मा फुले यांच्या कार्याचा व विचारांचा थोडक्यात परिचय करून देण्यात आला. त्यांच्या शिक्षणविषयक ध्येयधोरणांमुळे समाजात घडलेल्या सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.
रामराव आदिक पब्लिक स्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी







