शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

रयत शैक्षणिक संकुलात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात संपन्न

---Advertisement---


श्रीरामपूर : येथील डाकले महाविद्यालयात रयत शैक्षणिक संकुल श्रीरामपूरच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा उत्साहात पार पडला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांनी केले.
प्रमुख पाहुणे डॉ. सुभाष वाघमारे यांनी समाजपरिवर्तनासाठी महापुरुषांच्या विचारांची गरज अधोरेखित केली. यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींनी महाराष्ट्रात सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला.
रयत शिक्षण संस्था महात्मा फुले यांच्या विचारांवर उभी असून फातिमा शेख यांचे योगदानही महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले. या ग्रंथ प्रदर्शनास ८०० हून अधिक सेवक व विद्यार्थ्यांनी भेट दिली. प्राचार्य डॉ. प्रवीण बडधे, प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे, मुख्याध्यापक सुनील साळवे, मुख्याध्यापिका सौ. सोनाली पैठणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. डॉ. पौर्णिमा गुजर यांनी केले तर आभार सौ. सोनाली पैठणे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रो. डॉ. सादिक सय्यद, डॉ. शरद शेळके व डॉ. रामदास नान्नर यांच्यासह संकुलातील सर्व सेवक व संकुलातील रहिवासी सेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स व आजी- माजी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment