सोनई -इंदुप्रभा लॉन्स चांदा ता. नेवासायेथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन शुक्रवार दि. १७ एप्रिल रोजी उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये चांदा मंडळातील चांदा, रस्तापुर, देवगांव, शहापुर, कौठा, फत्तेपुर,मोरगव्हाण, मांडेगव्हाण, लोहारवाडी या गावांतील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.या शिबिरासाठी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांची प्रमुख उपस्थित होते.
या शिबिरात शासनाच्या महसूल विभागाच्या विविध दाखले व लाभार्थीनां वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री सुभाष दळवी (उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, अहिल्यानगर), श्री संजय बिरादार (तहसीलदार, नेवासा), सोनाली म्हात्रे (, अप्पर तहसीलदार घोडेगाव), धनंजय हिरवे (तालुका कृषी अधिकारी, नेवासा), गोसावी साहेब (भूमी अभिलेख विभाग), अमृता पडोळे (मंडळ अधिकारी,चांदा ) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य विजयाताई अंबाडे,माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब जावळे, नवनाथ साळुंखे, प्रमोद गजभार (सरपंच, कौठा), चांदाच्या माजी सरपंच सुनंदाताई दहातोंडे, मांडे मोरगव्हाणचे सरपंच अंकुश धंदक, शहापूर सरपंच संदीप कोलते,माजी सरपंच तुळशीदास शिंदे, विवेक अंबाडे, राहुल फुंदे, महेश काकडे, बाळासाहेब शिरसागर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.तसेच सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, महिला भगिनी, ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चांदा येथे महाराजस्व समाधान शिबीर संपन्न







