शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

लिटील वंडर्स स्कूलचे उत्तुंग यश

---Advertisement---


सलग 12 वर्ष SSC च्या 100% निकालाची परंपरा कायम

अहिल्यानगर : शांतिनिकेतन फौंडेशनचे लिटील वंडर्स स्कूल व विजडम हायस्कूल जेऊर (बा.) ता. नगर, जि. अहिल्यानगर, या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सलग बाराव्या वर्षीही माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये शंभर टक्के निकालाची उत्तुंग परंपरा कायम ठेवीत घवघवीत यश संपादन केले.
या वर्षी शाळेची विद्यार्थिनी कु. सायली संजय वाघ हिने 87.20% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर कु. जिज्ञासा अमोल वाघ हिने 81.20% गुण मिळवून द्वितीय तर कु. पायल कानिफनाथ शिकारे हिने 80.00% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला व इतर सर्व विद्यार्थ्यांनीही 60% पेक्षा जास्त गुण मिळवून शाळेचा नावलौकिक कायम राखला.
आमच्या विद्यालयात प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देवून अभ्यास करवून घेतला जातो त्यामुळेच शाळेव्यतिरिक्त बाहेरचे कोणतेही महागडे कोचिंग क्लासेस लावायची गरज पडत नाही. म्हणूनच सलग बारा वर्ष 100% निकाल देणारे आमच्या पंचक्रोशीतील हे एकमेव विद्यालय आहे, अशी माहिती शाळेच्या संचालिका सौ. स्वाती चेमटे यांनी दिली. यासाठी शाळेच्या शिक्षिका सौ. कल्पना वड्डेपल्ली, सौ. आयेशा सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चंद्रमौळी श्री धात्री यांनी दिली.
या सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे, जि. प. माजी सभापती श्री. बाजीराव पाटील गवारे, सरपंच सौ. ज्योती तोडमल, उपसरपंच सौ. अनिता बनकर, माजी सरपंच श्री. विकास कोथिंबीरे व श्री. मधुकरराव मगर तसेच पंचक्रोशीतील सर्व पालकांनी अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment