श्रीरामपूर : अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य योगावर भगवान परशुराम जयंती व मौनयोगी सद्गुरू रेवणनाथ महाराज यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त रविवार दिनांक १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता वडाळा महादेव येथील श्री क्षेत्र रेणुका देवी आश्रमात शिरसगाव येथील बाल संन्यासी हरिबाबा आश्रमाचे महंत योगी माणिकनाथ महाराजांचे हरि कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रथम भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून सद्गुरू चरण कमल पादुका अभिषेक महापूजा व समाधी पूजन करण्यात येणार आहे त्या नंतर महंत योगी माणिकनाथ महाराजांचे कीर्तन होणार असून कीर्तनानंतर महाआरती व महाप्रसादने महोत्सव सांगता होणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या पावन पर्वा निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रेणुका ऊपासना परिवार व श्री सद्गुरू सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे
वडाळा महादेव येथे रविवारी योगी माणिकनाथ महाराजांचे कीर्तन







