सोनई – सोनई येथील व्यावसायिक स्वर्गीय संतोष जनवीर यांचे दोन जुळया पुत्रांनी इयत्ता दहावी सीबीसी पॅटर्न परीक्षेत नेवासा तालुक्यात प्रथम क्रमांकची बाजी मारून यश संपादन केले. यानिमित्त सोनई येथे या जुळे भाऊ करण- अर्जुन संतोष जनवीर यांना गावकर्यांनी याप्रसंगी सन्मानित केले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर येळवंडे म्हणाले,जीवनात खिंड लावायची असेल तर बाजी प्रभू सारखी जिद्द अंगी बाळगावी लागते ती करण – अर्जुन यांनी जींकली असल्याचे मत त्यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी चंद्रकांत आघाव,कार्यकर्ते शकील बागवान, आई सरोज जनवीर, सेवा सोसायटीचे माजी व्हा.चेअरमन राजेंद्र जनवीर, माजी मुख्यध्यापिका सरोजणी जनवीर, व्यावसायिक निखिल बंग उपस्थित होते.
सोनईत करण अर्जुनचा सन्मान







