शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

कांबी ग्रामस्थांकडून वीज मोटार चोरट्याची धुलाई

---Advertisement---

कांबी : शेवगाव तालुक्यातील कांबी परिसरातील उजव्या कलव्यावरील शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारी स्टार्टर व केबल चोरीचे प्रमाण वाढल्याने रात्री शेतकर्‍यांनी गस्त सुरु केली. या परिसरात योगेश कुऱ्हे यांची कॅनल वरील विद्युत मोटार चोरट्यांनी काढताना काही शेतकर्‍यांनी बघितले. रात्री ९ वाजता शेतकर्‍यांनी एका चोरट्याला पकडून येथेच्छ चोप दिला, मात्र दबा धरून बसलेले त्याचे अन्य साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले.
कांबी येथील माजी उपसरपंच योगेश कुऱ्हे व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पिरमंहमद शेख यांनी शेवगाव तालुका पोलिस स्टेशनला यासंदर्भात माहिती दिली. कुऱ्हे यांची कालव्या वरील विद्युत मोटार चोरी होत असताना आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी गावात फोन करून यासंदर्भात माहिती दिली. गणेश मडके,शुभम राजपुत,सौरभ राजपुत,राधेश्याम देशमाने,सचिन माने, गणेश म्हस्के, गणेश चने, गोविंद डमाळ, विकास मडके, आदींसह गावातील १०० शेतकर्‍यांचा ग्रुप घटनास्थळी दाखल झाला. पकडलेल्या चोरट्याची यथेच्छ धुलाई करत त्याच्याकडून आणखी साथीदारांची नावे जाणून घेतली. व मध्यरात्री पो.उपनिरी क्षक प्रवीण महाले फौजफाट्यासह घटनास्थळी आले. चोरट्याला ताब्यात घेऊन ते परतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment