पुणे : भारती विद्यापीठाच्या कोथरूड येथील शैक्षणिक संकुलातील पूना कॉलेज ऑफ फार्मसी येथे अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (ANRF) आणि इंडियन फार्माकोलॉजिकल सोसायटी (IPS) यांच्या संयुक्त विद्यमाने, “फ्रॉम फास्ट पेस्ड लिव्हिंग टू फ्रॅजाइल माइंड्स: लाइफस्टाइल ड्रिव्हन न्यूरोकेमिकल डिस्रप्शन्स इन मेंटल हेल्थ” या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. सदर परिसंवाद २३ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत संपन्न झाला.
यावेळी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, इंडियन फार्माकोलॉजिकल सोसायटीचे महासचिव डॉ. बी. कलाकुमार, उपाध्यक्ष डॉ. एम. एन. सराफ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (NIMHANS) बेंगळुरू येथील डॉ. बी. एस. शंकरनारायण राव, पूना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. आत्माराम पवार, उपप्राचार्या डॉ. वर्षा पोखरकर, उपप्राचार्य डॉ. एल. सथियानारायणन, मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. ज्योती शेट्टी आणि आयोजन सचिव डॉ. उर्मिला अस्वार उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी आजच्या वेगवान जीवनशैलीमुळे मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल माहिती दिली. त्यांनी मानसिक संतुलन राखणे, तणाव कमी करणे आणि मन शांत ठेवण्याचे महत्त्वही स्पष्ट केले. आधुनिक जीवनशैलीमुळे मेंदूवर होणारे बदल आणि त्याचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम यावर सखोल चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते परिसंवादाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. या स्मरणिकेत विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी केलेल्या संशोधन पोस्टर्स आणि लेखांचा समावेश आहे. या परिसंवादात संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भारती विद्यापीठातील फार्मसी महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन







