शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

“विकासकामांचा सखोल आढावा; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश”

---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग आढावा बैठकछत्रपती संभाजीनगर, १६ एप्रिल :सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रादेशिक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विभागांतर्गत सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.बैठकीदरम्यान अधिनस्त कार्यालये, कार्यक्षेत्र, रस्ते व पूल यांची सांख्यिकी तसेच पुलांच्या तपशीलवार माहितीचे सादरीकरण करण्यात आले. 2022 सालापासून आजपर्यंत पूर्ण झालेली कामे, नाबार्ड अंतर्गत पूर्ण झालेले प्रकल्प तसेच हायब्रीड अॅन्युइटी (Hybrid Annuity) अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते व पूल प्रकल्पांची माहिती घेण्यात आली.यावेळी 2026 च्या अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या कामांचा आढावा घेऊन त्यांच्या अंमलबजावणीस गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. प्रगतीपथावरील इमारतीची कामे, जिल्ह्यातील शासकीय इमारती तसेच रुग्णालयीन इमारतींच्या गुणवत्तेबाबत विशेष लक्ष देण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले. बीड येथील जिल्हा रुग्णालय व 200 खाटांच्या महिला रुग्णालयाच्या इमारतीच्या गुणवत्तेबाबतही माहिती घेण्यात आली.रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती, प्रलंबित कामे तसेच पैठण व शिरूर परिसरातील प्रकल्पांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. नवीन कामांबरोबरच जुन्या कामांची दुरुस्ती करून नवीन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.तसेच, वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत लावण्यात आलेल्या झाडांची नियमित निगा राखली जाते आहे का याची माहिती घेऊन विश्रामगृह व शासकीय परिसरातील वृक्ष लागवडीची देखभाल सुनिश्चित करण्याचे आदेश देण्यात आले.बैठकीच्या शेवटी, सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपापली कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि जबाबदारीने पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य अभियंता श्री. अतुल चव्हाण, अधिक्षक अभियंता श्री. एस. एस. भगत, अधिक्षक अभियंता (विद्युत) श्रीमती समिधा सुरवसे, अधिक्षक अभियंता श्री. एन. व्ही. भंडे, विद्युत मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. दयानंद म्हात्रे, तसेच अधिक्षक अभियंता श्रीमती विभावरी वैद्य यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment