शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

अहमदपूर तालुक्यातील पाणीपुरवठा व वीजपुरवठा सुरळीत करा: सभापती सुरज पाटील यांच्या सूचना

---Advertisement---

अहमदपूर– तालुक्यात विविध ठिकाणी पाणीटंचाई होत असून त्या ठिकाणी योग्य अशा उपाययोजना पाणीपुरवठा विभागाने कराव्यात, त्याचबरोबर महावितरणने वीज पुरवठा सुरळीत ठेवावा अशा सूचना चा अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज बाबासाहेब पाटील यांनी मासिक बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. सुरज बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अहमदपूर पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सभापती सुरज पाटील यांनी, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोलर बसवण्यात यावे, त्याचबरोबर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील असणाऱ्या ठिकाणी डॉक्टरांची पद भरती करण्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे पाठपुरावा करावा. त्याचबरोबर तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभाग अंतर्गत येणाऱ्या जल जीवन मिशन योजनेची कामे तात्काळ पूर्ण करून पुरवठा कार्यान्वित करण्यात यावा. तालुक्यातील वेगवेगळ्या गावात पाणीपुरवठाची येणारी अडचणीची पूर्तता करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपभियंता महावितरण अहमदपूर शिरूर ताजमहल यांनी दक्षता घ्यावी जेणेकरून जनतेला पाणी व विजेची समस्या उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना सभापती सुरज पाटील यांनी आजच्या मासिक बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत उपसभापती आयोध्या केंद्रे व पंचायत समितीचे सर्व सदस्य सदस्य व पंचायत समितीचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. चौकट *माझं गाव आरोग्य संपन्न गाव सक्रियपणे राबवा: सभापती सुरज पाटील* महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने माझ गाव आरोग्य संपन्न गाव याची कार्यशाळा संपन्न झाली. यामध्ये सर्व ग्रामपंचायतीत ग्रामसभेत या संदर्भात माहिती देण्यात यावी तसेच सर्व ग्रामपंचायत यांनी या अभियानात सहभाग नोंदवावा असे आवाहन अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सुरज पाटील यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी पंकज शेळके व तालुका आरोग्य अधिकारी गणेश जाधव यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment