शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

वाई तालुक्यातील मांढरदेव काळूबाई व धोम नरसिंह सिद्धेश्वर देवस्थानांच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल

---Advertisement---

मुंबई : मंत्रालय स्तरावर ५ मे, २०२६ रोजी वाई तालुक्यातील मांढरदेव काळूबाई देवस्थान आणि धोम येथील नरसिंह सिद्धेश्वर देवस्थान या दोन्ही श्रद्धास्थानांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या दोन्ही देवस्थानांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी प्रस्तावाद्वारे राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार मा. श्री. जयकुमारजी गोरे भाऊ यांच्याकडे मांडण्यात आली.
वाई-खंडाळा-महाबळेश्वर परिसरातील युवा नेते विराज भैय्या शिंदे तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. ऋतुजाताई शिंदे यांनी ही मागणी प्रभावीपणे मांडली.
कोणत्याही भागाचा विकास करताना त्या भागातील धार्मिक व सांस्कृतिक केंद्रे सक्षम असणे अत्यावश्यक असते. ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यास या परिसरात मूलभूत सुविधा, लाखो भाविकांची सुरक्षा आणि स्थानिक पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. यामुळे पर्यटनवाढीसोबतच स्थानिक छोट्या व्यावसायिकांनाही मोठे बळ मिळेल.
या मागणीची दखल घेत माननीय ग्रामविकास मंत्र्यांनी तत्वतः मान्यता देत तातडीने ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासकीय स्तरावर मिळालेला हा ‘हिरवा कंदील’ परिसराच्या विकासासाठी अत्यंत आशादायी ठरणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या विषयावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून, श्रद्धास्थानांचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून तो आपल्या सांस्कृतिक वारशाच्या जतनाशीही निगडित आहे. भविष्यात या विकासकामांचा दर्जा टिकवून ठेवणे आणि या ठिकाणांचे पावित्र्य अबाधित राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असेल. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रशासकीय पाठपुरावा यांच्या जोरावर या भागाचा सर्वांगीण कायापालट निश्चितच शक्य आहे.यावेळी मांढरदेव पठारावरील ग्रामस्थ विजय मांढरे (उप विभाग प्रमुख, कुर्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), जगन्नाथ मांढरे (मा. सरपंच, वेरुळी), एकनाथ मांढरे, अमित मांढरे, संतोष मांढरे आणि कार्तिक मांढरे तसेच पठारावरील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment