३ लाख ६० हजार रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त
श्रीरामपूर : तालुक्यातील हरेगाव शिवारात हरेगाव ते ब्राम्हणगाव वेताळ जाणारे रोडवरुन टाटा कंपनीचा पिकअपमध्ये अवैधरित्या चोरुन वाळु भरुन वाहतुक करत असणाऱ्या टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस पथकाने ३ लाख ५० हजार रूपयांचा एक टाटा कंपनीचा पिकअप व २ ब्रास वाळू असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस प्रमुख मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस पथकाने हरेगाव गाव शिवारात हरेगाव ते ब्राम्हणगाव वेताळ जाणारे रोडवरुन एक निळसर रंगाचा टाटा कंपनीचा पिकअपमध्ये अवैधरित्या चोरुन वाळु भरुन वाहतुक करत असताना पथकाने सदर पिकअप गाडी थांबवुन चालकास ताब्यात घेवुन त्याचे नांव गाव विचारले असता तालुक्यातील वळदगाव येथील वसीम पाशु शेख असल्याचे सांगितले. या कारवाईत १० हजार रूपयांची २ ब्रास वाळूसह ३ लाख ५० हजार रूपयांचा एक टाटा कंपनीचा पिकअप असा एकूण ३ लाख ६० हजार रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी वसीम पाशु शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








