शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

संत ज्ञानेश्वर माऊलींची पसायदान प्रतिमा देऊन पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचा सन्मान

---Advertisement---

नेवासा : नेवासा येथील भूमिपुत्र व शिवसहकार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बालेंद्र पोतदार यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर माऊलींची पसायदान प्रतिमा देऊन पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचा मुंबई येथील महासंचालक कार्यालयात सन्मान करण्यात आला. विद्यार्थी दशेत असतांना संत ज्ञानेश्वर माऊलींच्या “पैस” खांबाचे दर्शन घेतले आता पुन्हा दर्शन घेण्यासाठी नेवासा येथे येईन अशी ग्वाही त्यांनी पोतदार यांच्याशी सुसंवाद साधतांना दिली.
   राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधतांना त्यांनी नेवासा येथील सुवर्णकार समाजाचे नेते व शिवसहकार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश  उपाध्यक्ष बालेंद्र पोतदार यांना मुंबई भेटीचे निमंत्रण दिले होते त्यानुसार बालेंद्र पोतदार यांनी आपल्या पत्नी सौ.मनिषा पोतदार,चिरंजीव इंजिनिअर अथर्व पोतदार यांच्या समवेत भेट घेऊन जुन्या स्मृतींना उजाळा देत चर्चा केली.
   यावेळी बालेंद्र पोतदार यांनी पसायदान प्रतिमा भेट देत नेवासा येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या पैस खांब मंदीराला भेट देण्याचे नियंत्रण दिले.हे निमंत्रण स्वीकारून मी विद्यार्थी दशेत माऊलीच्या दर्शनासाठी सन १९७९ साली नेवासा येथे आलो होतो आता येण्याची त्रिव ईच्छा असून मे महिन्यात मी नक्की दर्शनासाठी येईन अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलतांना दिली.नेवासा भेटीचे निमंत्रण  स्वीकारल्यानंतर बालेंद्र पोतदार यांनी दाते साहेबांना धन्यवाद देत आभार मानले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment