लाड सुवर्णकार संस्था त्र्यंबकेश्वर/ नाशिक या संस्थेचे बांधकाम सदस्य, सुवर्णकार समाजातील जेष्ठ समाजसेवक ह.भ.प चंद्रकांत अंबिलवादे पैठणकर यांना समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय समर्थ गौरव पुरस्कार छत्रपती संभाजीनगर येथील सोहळ्यात श्री. समाजसेवक मनोज जैन, संस्थेचे सचिव बिकुजी लोळगे, व्यवस्थापक किरण तायडे यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला आहे.ह.भ.प चंद्रकांत महाराज अंबिलवादे यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल लाड सुवर्णकार संस्थेचे अध्यक्ष दिलीपशेठ शहाणे, गोपालसेठ कुलथे, सुभाषशेठ शहाणे, प्रकाशशेठ भडकवाडे, अभिजीतशेठ पेडगावकर, विजयसेठ देवळालीकर, संपादक शरदशेठ कुलथे, मुक्ताताई डहाळे, अमोलशेठ मैड, सुनीलशेठ कुलथे आर्वीकर यांनी अभिनंदन केले आहे.
ह.भ.प चंद्रकांत अंबिलवादे यांना राज्यस्तरीय समर्थ कार्य पुरस्कार







