श्रीरामपूर : तालुक्यातील पंचक्रोशीचे ग्रामदैवत बेलापूर खुर्द येथील श्री.हरिहर केशव गोविंद भगवान तिर्थक्षेत्र बन येथे आज शुक्रवार दि. ३ एप्रिल पासुन ४५ वा अखंड हरिनाम सप्ताह सुरु होत आहे.
या सप्ताहात सर्वश्री विजय कुहिले फत्याबाद ,मोहनबुवा हिरवे पंढरपूर,सौ. रोहिणीताई परांजपे पुणे, आचार्य शुभम कांडेकर उंबरगाव ,अंकुश जगताप नेवासे आणि भागवताचार्य गणेश महाराज शिंदे उदापूरकर यांचे किर्तन आणि बाबांनंद महाराज वीर यांचे काल्याचे किर्तन होईल.
सप्ताह काळात पहाटे काकडा, केशव गोविंद भगवान यांची आरती, सकाळी सात वाजता श्री. केशव गोविंद महात्म्य ग्रंथाचे पारायण, सकाळी आठ ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी साडेचार ते सायंकाळी सहा हरिपाठ, त्यानंतर श्री. हरिहरांची आरती, धावा, सायंकाळी सात ते नऊ जाहीर हरिकीर्तन आणि त्यानंतर आमटी भाकरीचा महाप्रसाद ग्रहण याप्रमाणे नित्य धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील.
श्रीक्षेत्र श्री. हरिहर केशव गोविंद देवस्थान, बन येथे आयोजित या धार्मिक सोहळ्यात पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीक्षेत्र बन देवस्थान ट्रस्ट, समस्त बेलापूर खुर्द ग्रामस्थ आणि संयोजकांनी केले आहे.
आजपासून केशव गोविंद बनात ४५ वा अखंड हरिनाम सप्ताह








