शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

स्व.गोविंदराव आदिक पुण्यस्मरणार्थ मोफत हृदयरोग व रक्तदाब तपासणी शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

---Advertisement---

श्रीरामपूर : समाजहिताची भावना आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी या उदात्त हेतूने स्व.गोविंदरावजी आदिक यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र कृषक समाज व साखर कामगार हॉस्पिटल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत टू डे इको हृदयरोग व रक्तदाब तपासणी शिबिरास नागरिकांनी प्रचंड उस्फुर्त प्रतिसाद लाभला.प्रारंभी स्व.गोविंदराव आदिक यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचा शुभारंभ झाला. यावेळी खा गोविंदराव आदिक यांच्या स्मरणार्थ हॉस्पिटलमध्ये आयसीयू विभागाचा शुभारंभ अविनाश आदिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती ,प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ गौरव वर्मा व त्यांच्या सहकारी डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. प्रास्तविक करताना आयोजकांनी या शिबिरामागील उद्देश स्पष्ट करीत समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी अशा उपक्रमाची गरज अधोरेखित केली. मान्यवरांनी यावेळी आल्या मनोगतात स्व. गोविंदराव आदिक यांच्या सामाजिक,शैक्षणिक व लोकहितवादी कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला समाजातील सर्व घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचावी हीच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शन करताना प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ गौरव वर्मा यांनी हृदयविकार,उच्च रक्तदाब आणि बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत सविस्तर माहिती दिली. नियमित तपासणी ,संतुलित आहार,व्यायाम व तणावमुक्त जीवनशैलीचे महत्व त्यानी उपस्थितांना पटवून दिले. गंगाधर ओगले ट्रस्टच्या साखर कामगार हॉस्पिटलने गेल्या अनेक वर्षांपासून सर्व सामान्यांना स्वच्छ आधुनिक गुणवत्तापूर्ण आणि सर्वसामान्यांना परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देत आरोग्य क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी पुष्पलता आदिक, अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, डॉ. गौरव वर्मा, रुग्णालयाचे विश्वस्त अविनाश आपटे, ज्ञानदेव आहेर, अर्चना पानसरे, डॉ. रवींद्र जगधने, डॉ. दिलीप पडघन, डॉ जोशी, नितीन पवार, अरुण पाटील नाईक, इंद्रनाथ थोरात, जयंतराव चौधरी, बापूसाहेब पटारे, भाऊसाहेब वाघ, हंसराज आदिक, संदीप चोरगे, करणं नवले, सुरेश देवकर, तुषार संपत, प्रियांका जनवेजा, सोनम मुथा, शीतल जाधव, मुख्तार शहा,आशिष बोरावके, सुनील थोरात, कैलास बोर्डे, संजय छल्लारे, अशोक थोरे, आदित्य आदिक, अर्जुन आदिक, रंजन वाव्हळ, सुमित मुथा,आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ, सौ संगीता फासाटे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment