लोणी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत शासनाच्या वर्ग एक सहाय्यक विक्रीकर निरीक्षक पदी निवड लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ. विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी वदा बाळासाहेब निर्मळ यांची निवड झाल्याची माहिती प्राचार्य डाॅ.डि.एन. घोलप यांनी दिली.
कु. वृंदा निर्मळ ही पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या २०१९ च्या बॅचची माजी विद्यार्थिनी. वृंदा हिने बारावीनंतर शासकीय कृषी महाविद्यालय धुळे या ठिकाणी बीएससी ऍग्री पदवी संपादन केली. पुणे या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा कसून अभ्यास केला. प्रचंड संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर वृंदा यांना हे यश मिळाले.
तिच्या तिच्या यशाचे संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे डॉ.आर.ए. पवार यांनी अभिनंदन केले आहे.
माजी विद्यार्थी वदा निर्मळ सहाय्यक विक्रीकर निरीक्षक पदी निवड







