शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

सराफ सुवर्णकार व्यावसायिकांचे उपोषण स्थगित! उमेश बुऱ्हाडे, यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता!

---Advertisement---

नगर :- सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे आंदोलन काकासाहेब बुऱ्हाडे, उमेश बुऱ्हाडे यांच्या दहा दिवसापासून सुरू असलेले आंदोलन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. गोपनीय पथकातील कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा आणि उपनिरीक्षक यांची बदलीचे आश्वासन उपोषण कर्त्याना देण्यात आले. कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. सराफ व्यावसायिक भागवत आधापुरे ( बोधेगाव ता. शेवगाव ) यांना कोतवाली पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील तपासकामी ताब्यात घेतले. त्याची माहिती घेण्यासाठी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे अध्यक्ष उमेश बुऱ्हाडे कोतवाली पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना व त्यांच्या समवेत असणाऱ्या सराफ व्यावसायिकांना पोलीस पथकाने अमानुष मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ समितीने दिनांक 28 एप्रिल पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. सराफ व्यावसायिक यांच्या मागणीचा विचार करून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांना चौकशी देण्यात आली. सदर घटनेची चौकशी अहवालाच्या पुराव्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी संबधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा काढून एक वर्षाचे वेतन का थांबू नये, अशी विचारणा केली आहे.तर उपनिरीक्षक यांची बदलीची करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले. दरम्यान पोलीस अधिकारी आणि आंदोलन कर्ते यांच्या मागण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याची चर्चा घडवून आणण्यासाठी स्थानिक सराफ सुवर्णकार संघटनेचे सुभाष मुथ्था, प्रकाश लोळगे, सुभाष कायगावकर, प्रमोद बुऱ्हाडे, रावसाहेब बेद्रे, मुकुंद रत्नापुरकर, यांनी प्रयत्न केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment