शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

कृषिकन्यांनी रांगोळीतून साकारली खेडलेपरमानंद गावाची प्रतिकृती

---Advertisement---

सोनई : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न असलेल्या सोनई येथील मुळा एज्युकेशन संस्थेच्या कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता व कार्यानुभव अंतर्गत खेडलेपरमानंद गावाची रांगोळी कलेतून प्रतिकृती साकारत शेतकरी व ग्रामस्थांना साकारलेला नकाशा समजून सांगितला. यावेळी शेतीविषयक प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले.कृषिकन्या शिवानी चौधरी, सिध्दी माळवदे, साक्षी भोगल, भक्ती मांजरेकर, साक्षी कानगुडे व पल्लवी मंडलिक यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माती परीक्षण, मातीचे प्रकार, खत नियोजन व पाणी व्यवस्थापन विषयी माहिती दिली. यावेळी गिताराम महाराज तुवर, योगेश वैरागर,विजय जाधव, दादासाहेब रोटे, आशुतोष होन, रमेश राजळे संतोष घोरपडे आदी उपस्थित होते.मंदीर सभामंडपात काढण्यात आलेल्या रांगोळीत गावाचा वार्षिक तक्ता,उत्पादन व मातीचा तक्ता दर्शविला आहे.सामाजिक, रस्ते व रहदारीचा नकाशा दाखवून जलकुंभ व सर्व सहकारी कार्यालयांचा नकाशात समावेश करण्यात आलेला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. हरी मोरे, उपप्राचार्य प्रा.सुनिल बोरुडे, समन्वयक अनुप दरंदले, कार्यक्रम अधिकारी डाॅ. दिशा चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment