समता पतसंस्थेचे अध्यक्ष कोयटे अडचणीत
शिर्डी : “भोंदू अशोक खरातने जगदंबा आणि समता सहकारी पतसंस्थांतून ६० कोटींचे बेनामी व्यवहार केल्याचेपोलिस तपासात पुढे आले आहे. या पतसंस्थांमधील ५७ खात्यांचा नॉमिनी एकटा खरात आहे. या ५७ मध्ये ६ सरकारी अधिकारी, चाकणकर कुटुंबीयांतील दोघांची खाती आहेत. राहाता येथील समता पतसंस्थेत ५७ खातेदारांची तब्बल १०० खाती उघड झाली आहेत. “
“खरातसाठी शिर्डीमध्ये एजंट म्हणून काम करणारा अरविंद बावके याची दोन तर खरात कुटुंबीयांची यात ८ खाती आहेत. मे २०२१ ते जानेवारी २०२६ कालावधीत ही खाती कार्यरत होती. त्यानंतर बहुतांश रक्कम काढून घेण्यात आली. पोलिसांच्या सूचनेनुसार सर्व संबंधित खाती गोठवण्यात (फ्रीझ) आली आहेत, अशी माहिती समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी दिली.”







