शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

सोनई महाविद्यालयात डाॅ. विठ्ठल दरंदले सेवापुर्ती कार्यक्रम उत्साहात

---Advertisement---

सोनई : महाविद्यालयात असलेला राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास घडविणारा ठरतो. हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून रूजत असलेला सेवाभाव आयुष्यात निश्चित उपयोगी पडणारा ठरतो. असे प्रतिपादन पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांनी व्यक्त केले.सोनई महाविद्यालयाच्या सेमिनार हाॅलमध्ये झालेल्या प्रा. डाॅ. विठ्ठल दरंदले सेवापुर्ती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुळा एज्युकेशनचे सचिव उत्तमराव लोंढे होते. माजी प्राचार्य ए पी दरंदले, आनंदवन सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक दरंदले, बाळासाहेब सोनवणे, मुकुंद पोंधे, रामकिसन शिंदे उपस्थित होते. प्रसाद बानकर, भाऊसाहेब जगन्नाथ दरंदले, सिताराम तुवर, प्रा.संभाजी दराडे, अशोक तुवर यांचे भाषण झाले. गडाख व मान्यवरांच्या हस्ते डाॅ.विठ्ठल दरंदले यांना शाल,पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. गणेश हापसे यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. हरिश्चंद्र सडेकर यांनी आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment