श्रीरामपूर : तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा निमगाव शाळेत भारतरत्न,महामानव,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे महत्व स्पष्ट केले.शिक्षिका मिना निकम व सुधा गमे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर माहिती दिली.इयत्ता ४ थी चा सार्थक बाबासाहेब झुराळे याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा साकारली.यावेळी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना पेन बक्षीस देण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष महेंद्र साबळे उपस्थित होते.शेवटी प्रतिभा भिसे यांनी आभार मानले.
निमगाव शाळेत डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी







