श्रीरामपूर :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त लोयोला दिव्यवाणी (नॉदर्न ब्रांच) येथे मंगळवार, दि. १४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.या सोहळ्यास लोयोला दिव्यवाणी चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे. फा. अनिल चक्रनारायण, देवळालीचे उपनगराध्यक्ष प्रकाश ससाणे, श्रीरामपूर फेलोशिपचे अध्यक्ष पा. सॅम्युएल अमोलिक, पा. अण्णा अमोलिक, पा. सतीश आळहाट, पा. योगेश ठोकळ, पा. अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुमारे १० मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. वृत्तपत्र वितरण क्षेत्रात कार्यरत असलेले विजय बनसोडे, शेतकरी व सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते सचिन मंगल जगताप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, छायाचित्रकार अमोल कदम, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ढोकणे, सामाजिक न्याय विभागातील निलेश भालेराव, शिक्षण क्षेत्रातील रविंद्र लोंढे, आरोग्य सेवेत कार्यरत राजीव सालवे, पत्रकारिता व वन व्यवस्थापन क्षेत्रातील प्रमोद वाघमारे तसेच सायकलिंग स्पर्धांमध्ये सहभागी होणारे संजय भिसे आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भोसले, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, तालुकाध्यक्ष अजितकुमार सुडगे, भाऊसाहेब तोरणे, प्रमोद शिंदे, निशिकांत पंडित, डॉ. संजय दुशिंग, दिलीप सगळगिले, मंगल सगळगिले, संगीता क्षीरसागर, जॉन मोकळ, सुनील ससाणे, सतीश तोरणे, अजय लोंढे, संजय सालवे, सुनील बोरगे, प्रकाश निकाळे, विकास सांगळे, राहुल पवार, विजय सेवक, अजिंक्य नागरे, स्वाती पारखे, सोनाली बनसोडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन भाऊसाहेब तोरणे यांनी केले, तर प्रास्ताविक अजितकुमार सुडगे यांनी दीपक कदम यांनी आभार मानले.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात







