शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

अफवांवर विश्वास ठेवू नये, ड्रोन पाडण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल : पोलीस निरीक्षक देशमुख

---Advertisement---

श्रीरामपूर :रात्रीच्या वेळेस अवकाशात फिरणारे ड्रोन व चोरांच्या उठणाऱ्या अफवा यांचा कुठलाही संबंध नसुन नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. येत्या 3-4 दिवसांमध्ये पोलिसांकडून सदरचे ड्रोन पाडण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल तसेच काही संशयास्पद आढळल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केले. रात्रीच्या वेळेस अवकाशात फिरणारे ड्रोनमुळे नागरीकात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहे. या विषयावर बेलापुरच्या ग्रामसभेतही चर्चा झाली. त्यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी पोलीसांनी तातडीने ड्रोनबाबत नागरिकांना खुलासा करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तातडीने नागरीकांची बैठक आयोजित केली. त्यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थाचे म्हणणे ऐकून घेतले. यात संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष शरद नवले, अभिषेक खंडागळे,काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष दिलीप थोरात, अल्ताफ शेख, सचिन वाघ, पोलीस पाटील शिवाजी भोसले, पत्रकार विष्णुपंत डावरे आदिंची मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अरुण पाटील नाईक, बाळासाहेब दाणी, विलास थोरात, विशाल मेहत्रे, विशाल आंबेकर, नागेश बारहाते, अजिज शेख, गोपी दाणी, ऋतुराज वाघ,ऋषी मुंदडा,मोहसीन सय्यद, प्रशांत लड्डा, महेश थोरात, शिवाजी भोसले, पोलीस पाटील अशोक प्रधान, युवराज जोशी, उमेश पारधे, विशाल मेहेत्रे, रफिक शहा, अमोल राशिनकर, बाबुलाल पठाण, राज गुडे, नितीन शर्मा, रविंद्र मेहेत्रे, तस्वर बागवान, अरुण शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, पोलीस कॉन्स्टेबल आजीनाथ आंधळे, श्री.तमनर आदि ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर इस्माईल शेख यांनी आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment