श्रीरामपूर : डिझेल, पेट्रोल गॅस यांचे वाढलेले दर, कांद्याचे कोसळलेले भाव, नीट पेपर आणि श्रीरामपूरातील वाळू तस्करीचा विषय या गंभीर मुद्द्यांवर आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, देवळाली शहराध्यक्ष कृष्ण मुसमाडे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सदर भाव वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर भार पडला आहे. बारा वर्षात पेट्रोल ३८ टक्क्यांनी आणि डिझेलच्या किंमती ६३ टक्क्यांनी वाढेल आहे. असे असताना दुसरीकडे शेतकऱ्यांचा मालाला हमी भाव मिळत नाही. कांद्याच्या पडलेल्या भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला आला आहे. त्यामुळे शासनाने २५ रुपये किलो दराने कांदा खरेदी करावा. देशातील नीट पेपर फुटीमुळे २२ लाख विद्यार्थ्यांनचे भवितव्य धोक्यात आले आहे. श्रीरामपूर मतदार संघातील रामपूर येथील वाळू तस्करांकडून मारहाण झाली वाळू तस्करांचा तातडीने बंदोबस्त करुन गुन्हे दाखल करावे अन्यथा या सगळ्या मागण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी सभापती योगेश जाधव, कलीम कुरेशी, बिट्टूशेठ कक्कड, दासू पटारे, निलेश नागले, रणजीत पाटील, सागर भागवत रज्जाक पठाण, भोला दुगल, नजीर शेख, आबासाहेब कडू, अशोक जगधने, संजय गोसावी, सुनील साबळे, प्रवीण कोठावळे, वैभव गिरमे, अमजद पठाण, अमोल नाईक, गणेश गायधने, रामचंद्र काळे, अनिल चव्हाण, रवी गायकवाड, शरद वाळुंज, योगेश उंडे, हेमंत गायधने, महेश काळे, आबासाहेब माळी, सनी मंडलिक, वैभव कुऱ्हे , प्रशांत आल्हाट, राजेश जोंधळे, सागर दुपाटी आदींच्या सह्या आहेत.
डिझेल, पेट्रोल गॅस यांचे वाढलेले दर, कांद्याचे कोसळलेले भाव याविरुद्ध जिल्हा काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन







