शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

दिलीप वाघ यांना समाज भूषण पुरस्कार

---Advertisement---

नेवासा :नेवासा येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप वाघ पाटील यांना त्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी कार्यासाठी महाराष्ट्र साई जीवनगौरव पुरस्कार व समाज भूषण पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आले.
ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळा २०२६ शिर्डी येथील साईबाबांच्या पवित्र भूमीत शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वाघ यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी व परिसरात समाजहिताचे विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांनी भाविकांसाठी उत्तम सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या, तसेच गरजू नागरिक, गरीब वंचित घटक व आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक बांधिलकीला बळ प्राप्त झाले आहे. पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी मान्यवर पाहुणे, सामाजिक कार्यकर्ते,भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते वाघ यांना शाल, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना दिलीप पाटील वाघ यांनी साईबाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली आणि समाजासाठी कार्य करत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment