शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

श्रीराम मंदिरातील नृत्याविष्काराने भाविक झाले दंग!

---Advertisement---
  • ट्रेकॅम्प-धरोहर व अंजली नृत्यालयाचा उपक्रम, भरतनाट्यमच्या माध्यमातून नृत्यसेवा

अहिल्यानगर – रामनवमीनिमित्त नवीपेठ येथील श्रीराम मंदिरात श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टतर्फे ट्रेकॅम्प-धरोहर व अंजली नृत्यालय यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या नृत्यवंदनेने उपस्थित भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
प्राचीन मंदिरांबाबत जनजागृती करणारी ट्रेकॅम्प-धरोहर संस्था आणि अंजली नृत्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रामनवमीनिमित्त ही भरतनाट्यम नृत्यसेवा आयोजित करण्यात आली होती. श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला नेता सुभाष चौकाजवळ असणार्‍या श्रीराम मंदिरात अंजली नृत्यालयाच्या विद्यार्थिनींनी गीत रामायणामधील पद, श्रीराम भजन, श्रीराम अष्टकम, रामरक्षा स्तोत्र, पदम आदी विविध भक्तीपूर्ण नृत्याविष्कार भरतनाट्यम् कलेद्वारे सादर केले. या कार्यक्रमास भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यांनी या नृत्याविष्काराचा आनंद घेतला. कार्यक्रमानंतर अनेक भाविकांनी मनोगतात या नृत्यवंदना उपक्रमाचे कौतूक कले. जणू आपण अयोध्या नगरीत आलो आहोत, असा भास झाल्याचे काहींनी सांगितले. श्रीरामस्तुतीच्या गीतांवर तरुणींनी भरतनाट्यम्चा नृत्याविष्कार बहारदारपणे सादर केला. या सुमधूर कलाविष्काराला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. सुरेखा डावरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंजली नृत्यालयाच्या संस्कृती धुमाळ, अस्मिता दोडे, श्रुती ढोकणे, अस्मी चावक, वैष्णवी नरोड आणि करिश्मा कोठारी-जोशी यांनी अतिशय सुंदर पद्धतीने गीत रामायणातील ‘सेतू बांधा रे सागरी…’ तसेच रामाष्टकम, रामरक्षा स्तोत्र, श्रीराम चंद्र कृपाळू भजनं यावर मनमोहक नृत्य सादर केले. नृत्यविशारद पदवीधारक करिश्मा कोठारी-जोशी हिने लतादीदींच्या आवाजातील वात्सल्य भावातील ‘ठुमक चलत रामचंद्र…’ यावर भावपूर्ण नृत्य सादरीकरण केले. श्री हनुमानाच्या वेषभूषेत 6 वर्षांच्या पिहू जोशी या बालिकेने आपली भूमिका उत्तम बजावली. नृत्यसेवेनंतर श्रीराम मंदिर व्यवस्थापनातर्फे कलाकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास नगर शहरासह जिल्ह्यातून भाविक आले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment