संगमनेर : येथे आयोजित जनजागृती संवाद कार्यक्रमात हृदयरोग तज्ञ डॉ. अमेय इथापे, एमबीबीएस, डीएम कार्डिओलॉजिस्ट यांनी सांगितले .तसेच यांनी हृदयविकाराचा झटका, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
हृदयविकाराची प्रमुख कारणे म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल, धूम्रपान व तंबाखूचे सेवन,जास्त तेलकट व जंक फूड,व्यायामाचा अभाव, ताण-तणाव,लठ्ठपणा, अनुवंशिकता आणि मद्यपानाचे अति सेवन यामुळे हृदय विकाराचा धोका जाणवला जातो.
हृदयविकाराची लक्षणे वेळेवर ओळखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.छातीत दुखणे किंवा दाब जाणवणे,श्वास घेण्यास त्रास,अचानक घाम येणे, थकवा,हात, मान, पाठ किंवा जबड्यात जाणारे दुखणे,चक्कर येणे किंवा मळमळ ही सर्व गंभीर लक्षणे आहेत.
अशा कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असे डॉ अमेय इथापे यांनी सांगितले.तसेच आपले आरोग्य व हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित आहार घ्या, दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा,धूम्रपान आणि तंबाखू पूर्णपणे टाळा,ताण नियंत्रणासाठी योग, ध्यान आणि पुरेशी झोप घ्या,तसेच BP, साखर आणि कोलेस्ट्रॉल यांची नियमित तपासणी करा आणि वजन नियंत्रणात ठेवावे.
छातीत तीव्र दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास ताबडतोब जवळच्या रुग्णालयात जाऊन योग्य ते वेळेत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते.संगमनेर येथील मेडिकव्हर हॉस्पिटल, येथे फक्त १४०० रुपयांमध्ये विशेष हृदय तपासणी पॅकेज उपलब्ध आहे,ज्यात TMT, 2D Echo, ECG आणि तज्ञ डॉक्टरांचे कन्सल्टेशन समाविष्ट आहे.गरजू रुग्णांनी विषेश तपासणी करून घ्यावी.मेडिकव्हर हॉस्पिटल येथील रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा,अनुभवी तज्ञ डॉक्टरांची टीम आणि विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या जातात.
तसेच, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना,प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, MPKAY आणि ECHS या शासकीय योजनांअंतर्गत उपचार सुविधा उपलब्ध आहेत.
योजनांमध्ये समाविष्ट नसलेल्या शस्त्रक्रियां साठी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत मदत उपलब्ध करून दिल्या जातात.
अशी माहिती केंद्रप्रमुख डॉ. स्नेहल गायके यांनी दिली.निरोगी जिवना साठी हृदयाची काळजी घेणे जरुरीचे आहे असे डॉ अमेय इथापे यांनी सांगितले.
“हृदय विकारा विषयी जनजागृती करणे ही आजची काळाची गरज. डॉ.अमेय इथापे . (कार्डिओलाॅजिस्ट) मेडिकव्हर हॉस्पिटल







