शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

काँग्रेसचे संघटन सृजन अभियान

---Advertisement---

श्रीरामपूर काँग्रेसचा बालेकिल्ला ; राजेश ठाकूर

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर हा काँग्रेसचाच बालेकिल्ला असल्याचे प्रतिपादन झारखंडचे माजी प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर यांनी केले आहे.श्रीरामपुरात आज संघटन सृजन अभियान अंतर्गत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव कोळगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी कृष्णा सांगळे, नगरध्यक्ष करण ससाणे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव दिपाली ससाणे, गटनेते मुजफ्फर शेख व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी खासदार कोळगे म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील स्वर्गीय जयंतराव ससाणे यांचा वारसा लाभलेल्या पुरोगामी विचार असलेल्या श्रीरामपूर विधानसभा तसेच नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने मोठे यश संपादन केले येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, आमदार हेमंत ओगले यांच्या नेतृत्वाखाली येत्या सर्वच निवडणुका काँग्रेस पक्ष ताकदीनिशी लढणार असून मोठा विजय संपादन करु असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रास्ताविक करतांना जिल्हाध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, गेल्या तीस – ते पस्तीस वर्षांपासून श्रीरामपूर मध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. जुन्या – नव्याचा मेळ घालून पक्ष वाढीसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव दिपाली ससाणे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गटनेते मुजफ्फर शेख यांनी केले तर आभार मास्टर सरवरअली सय्यद यांनी मानले.
यावेळी सभापती राजेंद्र पवार, दिपक वमने, योगेश जाधव, ज्येष्ठ नगरसेवक दिलीप नागरे, दिलीप सानप, राजेंद्र पाऊलबुद्धे, विलास दाभाडे, राजू चक्रनारायण, नगरसेविका वैशाली पोटे, प्रणिती चव्हाण, आशा परदेशी, सोनिया कक्कड, योगिता नागले, सुजाता बारगळ, डॉ. दिलीप शिरसाठ, कलीम कुरेशी, मुन्ना पठाण, लकी सेठी, जावेद शेख, रवी खिलारी, सुभाष पोट, फिरोज शाह, दिपक चव्हाण, संतोष परदेशी, भारत भंवर, राधाकिसन बोरकर, प्रेमचंद कुंकूलोळ, मुरली राऊत, सुरेश भडांगे, अशोक बागुल, प्रकाश थोरात, भारत बढे, कांतीशेठ पटेल, अमोल नाईक, सोमनाथ पाबळे, प्रशांत राऊत, प्रताप कवडे, रज्जाक पठाण, जफर शहा, प्रवीण कोठावळे, बिट्टू कक्कड, छबूकाका पवार , रावसाहेब आल्हाट, अरुण मांडलिक, सुनील साबळे, अशोक जगधने, भाग्येश लोखंडे, अभिजित लिप्टे, रितेश चव्हाणके, सनी मंडलिक, यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment