शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

गठ्ठा मतांच्या लाचारीमुळे “त्या प्रकरणात” काँग्रेस गप्प – भाजपचा सवाल

---Advertisement---

श्रीरामपूर : शहरातील सय्यदबाबा चौकात श्रीरामनवमी झेंड्यावर झालेली दगडफेक, वॉर्ड नंबर २ मध्ये नगरपालिका वसुली अधिकाऱ्याला झालेली मारहाण दोन्ही प्रकरणात काँग्रेस नेत्यांनी चुप्पी का साधली ? याचे जनतेला उत्तर द्यावे असा जोरदार टोला श्रीनिवास बिहानी, भाजप गटनेत्या वैशाली चव्हाण व भाजप शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड यांनी आमदार हेमंत ओगले व नगराध्यक्ष करण ससाणे यांना लगावला.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात श्रीरामपूर शहर भाजपने म्हटले आहे की, दरवर्षी निघणाऱ्या श्रीरामनवमीची झेंडा मिरवणुक सय्यदबाबा चौकातील दर्ग्यासमोर आल्यावर काही समाज कंटकांनी त्यावर दगडफेक केली त्यात एका रामभक्ताच्या डोळ्याला मोठी इजा झाली मात्र दगडफेक करणारे संशयित एका मोठ्या समुदायाचे घटक असल्याने त्यांच्याविरोधात काँग्रेसचे आमदार ओगले आणि काँग्रेसचे नगराध्यक्ष ससाणे यांचा कंठ फुटेनासा झाला.
त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी वॉर्ड नं. २ मध्ये वसुलीच्या कामासाठी गेलेल्या नगरपालिकेचे अ श्रेणी अधिकारी असलेल्या वसुली अधिकाऱ्यावर ५ ते ६ जणांनी हल्ला केला. नगरपालिकेत सत्तेत असलेले नगराध्यक्ष ससाणे मतांच्या लाचारीमुळे या घटनेचा निषेधही करू शकले नाही. सत्तेत असूनही आमदार, नगराध्यक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संरक्षण करू शकत नसतील तर त्यांनी एक तर राजीनामे द्यावे अन्यथा ते मतांसाठी लाचार आहेत हे जाहीर करावे असे थेट आव्हान भाजपचे नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, आशिष धनवटे, दीपक चव्हाण, संजय गांगड, मनोज लबडे, सिद्धार्थ फंड, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे, सौ.जयश्री रवी पाटील, सौ.आशा शशांक रासकर, भाजप महिला शहराध्यक्ष सौ.स्वाती प्रशांत चव्हाण, युवा मोर्चा शहराध्यक्ष रूपेश हरकल, रवी पाटील, केतन खोरे, शशांक रासकर, मारुती बिंगले, बंडूकुमार शिंदे, तिलक डुंगरवाल, विशाल अंभोरे, सौ.पुष्पलता बाळासाहेब हरदास, सौ.पूजा हर्षद चव्हाण, रवी पंडित, शंकर चव्हाण आदींनी दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment