शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

मानसिक आरोग्य शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; डॉ. ढोबळे हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम

---Advertisement---


श्रीरामपूर :जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून डॉ. ढोबळे हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत मानसिक आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. धावपळीच्या जीवनात शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य जपण्याची गरज या शिबिराच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आली.
समाजात मानसिक आजारांबद्दल असलेले गैरसमज दूर व्हावेत आणि नागरिकांना योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मुकुल ढोबळे यांनी या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांची वैयक्तिक तपासणी केली. यावेळी त्यांनी ताणतणाव, नैराश्य , चिंता , निद्रानाश आणि भावनिक अस्थिरता या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मानसिक अस्वस्थता वाढत असल्याचे डॉ. ढोबळे यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमादरम्यान मानसिक आरोग्याविषयी माहिती देणाऱ्या पत्रकांचे वाटप करण्यात आले. ज्या नागरिकांना दीर्घकालीन उपचारांची किंवा समुपदेशनाची गरज आहे, त्यांच्यासाठी पुढील सत्रांची नोंदणीही मोफत करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment