संगमनेर : तालुक्यातील सावरचोळ मेंगाळवाडी येथील जागृत आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बिरोबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. या साठी आमदार अमोल खताळ यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश आले आहे क वर्ग दर्जा मिळाल्यामुळे देवस्थानच्या विकासाला गती मिळणार आहे त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.बिरोबा देवस्थान हे सावरचोळ मेंगाळवाडी तसेच अकोले-संगमनेर परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. वर्षभर येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यात्रोत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि पारंपरिक उत्सवां मुळे या देवस्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शासनाकडून ‘क’ वर्ग दर्जा मिळाल्यामुळे मंदिर परिसरा तील पायाभूत सुविधा, रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, भक्तनिवास आणि इतर विकासकामांसाठीचा निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.चौकट संगमनेर तालुक्यातील सावरचोळ मेंगाळवाडी येथील ग्रामदैवत बिरोबा महाराज मंदिर अम्मा ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे या देवस्थानचा क वर्ग दर्जात समावेश व्हावा यासाठी आम्ही दोन ते अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रस्ताव दाखल केला होता परंतु त्यास यश येत नव्हते आम्ही सर्व ग्रामस्थ तसेच देवस्थान ट्रस्ट ने या देवस्थानला क वर्ग दर्जा मिळावा यासाठी आमदार अमोल खताळ यांच्याकडे मागणी केली त्यानुसार आमदार अमोल खताळ यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला त्यानुसार जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये या मंदिराला वर्ग दर्जा मिळाला त्यामुळे आमचा आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचे सरपंच सुनीता कानवडे संजय कानवडे संपत कानवडे सागर कानवडे यांच्यासह सावरचोळ मेंगाळवाडी ग्रामस्थांनी सांगितले.
सावरचोरळ मेंगाळवाडी बिरोबा देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा;आ . अमोल खताळ यांनी पालक मंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश







