शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

महेश नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सी.ए.कैलास सोमाणी तर व्हा.चेअरमनपदी राजेश लढ्ढा यांची निवड

---Advertisement---

संगमनेर : शहरातील अग्रगण्य महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सी.ए. कैलास सोमाणी तर व्हा. चेअरमनपदी राजेश लड्डा यांची बिनविरोध निवड सहकार खात्याचे अधिकारी आर.एस.वाकचौरे यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पकडली . मावळते चेअरमन दिनेश सोमाणी व्हा.चेअरमन संतोष चांडक संचालक अनिल अट्टल,योगेश जाजू,श्रीकांत मणियार,सौ.ज्योती कासट,विशाल नावंदर,अनिल कलंत्री,निलेश बाहेती,योगेश रहातेकर,मोरेश्वर कोथमिरे, सुदर्शन लाहोटी व व्यवस्थापक दिगंबर आडकी आदी मान्यवर उपस्थित होते.महेश पतसंस्था ही अहील्यानगर जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था असुन एकुण व्यवसाय रु.२६२ कोटी आहे. अत्यंत स्पर्धात्मक दराने, गतिमान व सुलभ कर्जवाटपाबाबत संस्थेचा नावलौकिक आहे. थकबाकी अत्यल्प असुन सभासदांसाठी वैद्यकीय मदत, सातत्याने १५% डिव्हीडंड, दीपावली भेट, ज्येष्ठ सभासदांसाठी १०% व्याजदराची ठेवयोजना, सभासदांच्या मुलींसाठी गिफ्ट बाँड अशा अनेक नावीन्यपूर्ण योजना संस्थेतर्फे राबविल्या जातात. निवडप्रसंगी मनोगत व्यक्त करताना पाचव्या वेळी चेअरमन पदी निवड झालेले चेअरमन सीए कैलास सोमाणी यांनी सन २०२५-२६ च्या आर्थिक वर्षात चांगल्या कामगिरीबद्दल गतवर्षीचे चेअरमन दिनेश सोमाणी व्हा.चेअरमन संतोष चांडक यांचे अभिनंदन केले.येणाऱ्या काळात बदलत्या अर्थव्यवस्थेत ग्राहकांना संस्थेमार्फत उत्तमरीत्या व वेगवान सेवा सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.संस्थापक चेअरमन स्व.मोहनलालजी मणियार यांनी २२ वर्षांपूर्वी लावलेल्या रोपाच्या आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. नूतन व्हा.चेअरमन राजेश लड्डा (प्रतिथयश व्यापारी, संगमनेर)यांनी कर्ज प्रक्रियेत सुलभता करण्यासाठी, तसेच स्वनिधी वाढवण्यास भर दिला जाईल, असे सांगितले सदर सभेत संस्थापक संचालक डाॅ शशिकांत पोफळे व अनिल अट्टल यांनी संस्थेच्या गतिमान व पारदर्शी कारभाराच्या बळावर कामकाजात सतत लक्ष देऊन पुढे प्रगतीची घोडदौड अशीच चालू राहावी,अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.तसेच संस्थेचे संचालक आनंद तापडे, नानासाहेब शेरमाळे, सौ. सरला आसावा व जयप्रकाश भुतडा यांनी नूतन चेअरमन सी.ए. कैलास सोमाणी व्हा. चेअरमन राजेश लढ्ढा यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी मावळते चेअरमन दिनेश सोमाणी व व्हा.चेअरमन संतोष चांडक यांनी सर्व संचालकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सभासद व मित्रपरिवार उपस्थित होता.या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment