लोणी : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या सन २०२५-२६ बोर्ड परीक्षेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली व उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचा व शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. परीक्षेत शाळेच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवले आहेत.यामध्ये चि. पृथ्वीराज संभाजी भोसले याने ९७% गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.तसेच कु.सुधी दीपक धामणे हिने ९६.८०% गुण मिळवत व्दितीय,प्रथमेश सत्यविजय घुले याने ९५.२०% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकाविला आहे.अशी माहीती प्राचार्य विजय आहेर यांनी दिली. यावर्षी शाळेतील १९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत उज्जवल यश संपादन केले असून, ५१ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे, तर ३२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे माहिती तंत्रज्ञान (IT) विषयात चि.पृथ्वीराज संभाजी भोसले व चि.तन्मय धनंजय अनाप या विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळविले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, व्यवस्थापन समिती, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील आणि शिक्षण संचालिका यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य ,सर्व शिक्षक,शिक्षकेतर सेवकवृंद व पालक यांनीही अभिनंदन केले आहे.
प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलची दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायमसीबीएसई निकाल शंभर टक्के







