शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

कृषि महाविद्यालय, सोनईच्या २७ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड

---Advertisement---

सोनई : मुळा एज्युकेशनच्या कृषि महाविद्यालय, सोनई येथील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या वतीने आयोजित विद्यार्थी नोकरी भरती उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा उपक्रम कृषि महाविद्यालय, सोनई व फार्मसन्स ॲग्री सोलुशन्स लिमिटेड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या निवडीसाठी कंपनीतर्फे कृषि विद्याव्यता डॉ. आशुतोष धोंडे, डॉ. कांतिलाल चांदे आणि क्षेत्रिय विपणन व्यवस्थापक पंढरीनाथ औटी, प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य प्रा. सुनिल बोरुडे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत मुलाखती घेतल्या. कार्यक्रमांमध्ये मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कृषि क्षेत्रातील बदलते स्वरूप, उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा तसेच करिअरच्या विविध संधींबाबत सखोल मार्गदर्शनही केले. या भरती प्रक्रियेसाठी एकूण ४९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २७ विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी थेट संपर्क साधण्याची आणि करिअरच्या नव्या संधींचा मार्ग खुला करण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली. याप्रसंगी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदिप तांबे, डॉ. संतोष चौगुले, प्रविण बेल्हेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ. अविनाश काकडे यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment