शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

श्रीरामपुरात भाजपचा स्थापना दिवस साजरा

---Advertisement---
  • पक्षाची यशस्वी वाटचाल जनतेच्या पाठबळावर – जितेंद्र छाजेड

श्रीरामपूर : 6 एप्रिल भाजपा स्थापना दिवस निमित्त भारत माता, पंडित दीनदयाळ उपाध्ये, अटलजी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन व पेढे वाटप करून श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीच्यावतीने स्थापना दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, गटनेते वैशाली चव्हाण, भाजपनेते संजय फंड,महिला शहराध्यक्ष स्वातीताई चव्हाण,नगरसेवक आशिष धनवटे,दिपक चव्हाण,रवी पाटील,श्रीनिवास बिहाणी,मनोज लबडे उपस्थित होते.
शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड म्हणाले, भारतीय जनता पक्षाची ओळख ही समर्पित भावनेन काम करणा-या कार्यकत्याचे मजबूत संघटन आहे. भारत देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी भाजपाने नेहमीच राष्ट्र प्रथम ही भूमिका घेवून काम केले. लोकांच्या हक्कासाठी संघर्ष आणि विकासाच्या प्रक्रीयेसाठी पक्षाचे धोरण राहील्याने ४६ वर्षाची यशस्वी वाटचाल जनतेच्या पाठबळावर अधिक मजबूत झाली आहे. विकसीत भारताच्या भविष्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली वाटचाल देशाच्या उज्वल भवितव्याचे द्योतक आहे. निमित्ताने सर्व पदाधिकारी नगरसेवक व सर्व मतदार बंधू भगिनींना यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगरसेवक संजय गांगड, संजय छल्लारे, रवीजी गुलाटी, राजेश अलग, मारुती बिंगले, सरचिटणीस विशाल अंभोरे, बंडूकुमार शिंदे, अरुण धर्मअधिकारी, मिलिंदकुमार साळवे, संजय कसलीवालं, शंकर चव्हाण, सुबोध शेवतेकर, प्रतीक वैद्य, अमोल शेटे, किरण कर्नावट, महेश सूळ, पृथ्वीराज चव्हाण, सचिन (मन्नू) धोत्रे, राहुल फुलारे, नवनाथ पवार, किरण पठारे, अवधूत शिंदे, सागर जाधव, श्रीयश झिरंगे, विशाल थोरात तसेच महिला मोर्चा व भारतीय जनता पार्टीचे सदस्य उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment