शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

श्रीरामपुरातील राम मंदिरात अधिक मासनिमित्तउद्यापासून भागवत कथा सप्ताह

---Advertisement---

श्रीरामपूर : श्रीराम मंदिर ट्रस्ट मेन रोड आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताह उद्या रविवार दिनांक 17 मे 2026 ते शनिवार दिनांक 23 मे 2026 श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते गुरुदेव सचिन जोशी पुणतांबेकर आपल्या भक्तीभाव रसाळ वाणीतून श्रीमद् भागवत कथा सांगणार आहेत तरी सर्वांनी श्रीमद् भागवत कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्षा श्रीमती प्रणिता राजन गिरमे यांनी केले आहे.
श्रीराम मंदिर ट्रस्ट मेन रोड आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताह रविवार दिनांक 17 मे 2026 ते शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी रोज दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत होणार आहे .उद्या रविवार दि. 17 मे रोजी शोभायात्रा, श्री भागवत प्रतिष्ठापना, भागवत महात्म्य, मुनीजिज्ञासा, परीक्षित चरित्र , दि. 18 मे रोजी वराह अवतार, मनुकर्दम चरित्र ,कपिलमुनी चरित्र, सती चरित्र मंगळवार दि. 19 मे रोजी ध्रुव आख्यान, जडभरत चरित्र ,नृसिंह अवतार बुधवार दि. 20 मे रोजी गजेंद्रमोक्ष, श्री वामन अवतार व वामनपूजा, श्रीराम चरित्र ,श्रीकृष्ण जन्मोत्सव गुरुवार दि. 21 मे रोजी श्रीकृष्ण बाललीला, श्री गोवर्धन पूजा शुक्रवार दि. 22 मे रोजी मधुरालीला, द्वारकालीला ,श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह सोहळा शनिवार दि. 23 मे रोजी सुदामा पूजन, भागवतधर्म, कार्यक्रमाची सांगता, श्रीविष्णूयाग व महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्वांनी श्रीमद् भागवत कथा श्रावणाचा लाभ घ्यावा असे आहवान श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमती प्रणिता राजन गिरमे, सेक्रेटरी दिनेश सूर्यवंशी, रोनक गिरमे, रमेश झिरंगे, वैशाली गिरमे, अशोक फोपळे, अमोल महाले प्रतीक बोरावके, सुरज गिरमे यांनी केले आहे.
संकल्प प्रभू श्री रामचंद्राचे सिंहासन आणि चांदीचा गाभारा करण्याचे संकल्प श्रीराम मंदिर ट्रस्टने घेतला आहे त्यासाठी अंदाजे 30 ते 35 किलो चांदी लागणार आहे तरी भाविकांनी रोख रक्कम किंवा चांदी सढळ हाताने दान करावी ही विनंती श्रीराम मंदिर ट्रस्टच्यावतीने करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment