प्रगतीनगर – अशोक शैक्षणिक संकुलाचे संस्थापक माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या अधिपत्याखालील व अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखालील अशोक इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा एसएससी परीक्षा मार्च २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या स्कूलची गेल्या नऊ वर्षाची शंभर टक्के निकालाचे परंपरा कायम ठेवली आहे. प्रथम गुणांनुक्रमे तीन विद्यार्थी प्रथम सय्यद अर्शद मुस्ताक (85.60), द्वितीय मांजरे गौरी दीपक (85.40), तृतीय पुंड अथर्व अजयकुमार (85.20) आले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य संपत देसाई व शिक्षक माधुरी कुंदे, अवेज बागवान, लक्ष्मी जाधव, ऋतुजा मचापुरे, पल्लवी कोतकर, हिना पटेल, सविता पटारे, भक्ती भागवत, भाग्यश्री पागिरे, निलेश पंडित या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आ. भानुदास मुरकुटे, कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब आदिक, ऍग्रो इंडस्ट्रीज एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष सोपानराव राऊत , सचिव विरेश गलांडे, मुळा प्रवरा वीज संस्थेचे माजी संचालक सिद्धार्थ मुरकुटे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, कारखान्याचे संचालक नीरज मुरकुटे कार्यकारी संचालक संतोष देवकर, संस्थेचे सहसचिव विजयराव धुमाळ, प्राचार्य अंजाबापू शिंदे, प्राचार्य प्रसाद कोते, प्राचार्या डॉ.सुनिताताई गायकवाड, प्राचार्य रईस शेख आदींनी अभिनंदन केले आहे.
अशोक इंग्लिश मीडियम स्कूलचा एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के







