शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

प्रथम वर्ष बी.टेक परीक्षेत अशोक इंजिनिअरिंगचे उल्लेखनीय यश

---Advertisement---

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील सिद्धी बंगाळ ९२ टक्के गुणांसह महाविद्यालयात प्रथम

अशोकनगर : लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील व अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली अशोक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांनी नुकताच जाहीर केलेल्या प्रथम सत्राच्या निकालामध्ये संस्थेचा एकूण सरासरी निकाल तब्बल ८५.५२ टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे संस्थेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, नियमित प्रात्यक्षिके, तांत्रिक मार्गदर्शन तसेच अभ्यासास पूरक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला व शिक्षकांच्या मार्गदर्शनाला या निकालातून यशाची पावती मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागामध्ये सिद्धी बंगाळ हिने ९२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सिमरन शेख हिने ८४.६० सह द्वितीय, तर आरती राऊत हिने ८२ टक्केसह तृतीय क्रमांक मिळवून विभागाच्या यशात मोलाची भर घातली.इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात प्रणित लबडे यांनी ७६.७० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. दीपक राऊत याने ७६ टक्केसह द्वितीय, तर भक्ती वाणी हिने ७१.११ टक्के सह तृतीय क्रमांक पटकावला.मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शुभम तिवारी याने ८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. श्रेयस शेरकर यांनी ७७.७६ टक्के सह द्वितीय, तर ऋषिकेश कोल्हे याने ७४.१० टक्के सह तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment