शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

जेईईमध्ये अंशुल निर्मळचे घवघवीत यश; आयआयटी मध्ये प्रवेश निश्चित

---Advertisement---

श्रीरामपूर:- देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या जेईई मेन्स व जेईई अँडव्हान्स परीक्षांमध्ये श्रीरामपूरच्या अंशुल प्रवीण निर्मळ याने उज्ज्वल यश संपादन करून कुटुंबासह संपूर्ण परिसराचे नाव उंचावले आहे. अंशुलने जेईई मेन्स- 2026 परीक्षेत 99.50 पर्सेंटाइल मिळवले असून जेईई अँडव्हान्स परीक्षेत संपूर्ण भारतातून 8958 वी अखिल भारतीय रँक (AIR) प्राप्त केली आहे. या यशामुळे त्याचा देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (IIT) प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.अंशुल हा लहानपणापासूनच अभ्यासात सातत्याने प्रगती करणारा विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. त्याने दहावीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची चुणूक दाखवली होती. त्यानंतर विज्ञान शाखेत शिक्षण घेत असताना त्याने जेईई परीक्षेचे नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण तयारीवर लक्ष केंद्रित केले. कठोर परिश्रम, नियमित अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेतही त्यांने 91% गुण मिळवले आहे.अंशुल हा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील सोलेस इन्फोटेक नासिक चे संस्थापक व उद्योजक प्रवीण निर्मळ यांचा सुपुत्र आहे. तसेच अंशुल हा औद्योगिक क्षेत्रातील नावाजलेल्या मेकापावर संस्थेचे संस्थापक प्रशांत निर्मळ व शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, पेंटागॉन इन्स्टिट्यूटचे संचालक व केंब्रिज स्कूलचे संस्थापक प्रमोद निर्मळ यांचा पुतण्या आहे.देशभरातील १५ लाख विद्यार्थ्यांमधून स्पर्धा करून जेईई अॅडव्हान्स्डमध्ये मानाचे स्थान मिळवणे ही मोठी कामगिरी मानली जाते. अंशुलच्या यशामुळे त्याच्या कुटुंबीयांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.भविष्यात आयआयटीमधून उच्च तांत्रिक शिक्षण घेऊन संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान देण्याची इच्छा अंशुलने व्यक्त केली आहे. त्याच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भावना निर्माण झाली असून अनेक विद्यार्थ्यांसाठी त्याची वाटचाल प्रेरणादायी ठरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment