शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य
---Advertisement---

अनिती, अन्याय आणि अत्याचाराचा हुंकार म्हणजे भगवान परशुराम – योगी माणिकनाथ महाराज

  • मौन योगी रेवणनाथ महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न

श्रीरामपूर : समाजात जेव्हा असमतोल निर्माण होतो धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवान अवतार धारण करतात म्हणूनच त्रेतायुगात अनिती, अन्याय आणि अत्याचाराचा नायनाट करण्यासाठी तेजरुपी भगवान परशुराम यांचा अवतार झाला, क्षात्रतेज आणि ब्रह्मतेजाचे प्रतिक ,नाथ संप्रदायाचे अधिष्ठान म्हणजे भगवान परशुराम असल्याचे प्रतिपादन शिरसगाव येथील बाल संन्यासी हरिबाबा आश्रमाचे महंत योगी माणिकनाथ महाराज यांनी केले आहे.
वडाळा महादेव येथील श्री क्षेत्र रेणुका देवी आश्रमात अक्षय्य तृतीया आणि मौन योगी रेवणनाथ महाराज यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तन प्रसंगी ते बोलत होते. ह. भ. प. दत्तात्रय भालेराव महाराज, तुकाराम महाराज, कैलास दुनियाच महाराज, बाळासाहेब महाराज, गणेश महाराज मृदुंगाचार्य अशोक महाराज व वडाळा महादेव, शिरसगाव पंचक्रोशीतील भजनी मंडळ यांची साथसंगत होती.
सकाळी राजराजेश्वरी रेणुका देवी महापूजा करण्यात आली दुपारी मौन योगी रेवणनाथ महाराज यांचे श्राद्ध व तर्पण विधी संपन्न झाला सायंकाळी सद्गुरू समाधी पूजन करण्यात आले. पौरोहित्य ओंकार कुलकर्णी गुरुजी यांनी केले सौ व‌ श्री अनिल गजर यांच्या हस्ते महाआरती झाली संजय नेहूल पाटील यांनी तांबुल विडा प्रसाद अर्पण केला महाप्रसादाने पुण्यतिथी महोत्सव सांगता झाली यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक हिंद सेवा मंडळाचे संजय जोशी, दत्तात्रय साबळे,सुशिल गांधी, अरुण धर्माधिकारी, वडाळा महादेवचे सरपंच सचिन पवार, उत्तम काका पवार, ज्ञानदेव पवार निपाणी वडगावचे माजी सरपंच रविंद्र पवार, शिवसेना नेते संतोष डहाळे , प्राचार्य डॉ शंकरराव गागरे, सौ व‌ श्री मुर्तडक, विनोद मलिक, कैलास अनारसे,विलास अनारसे, उध्दव आहेर सामाजिक कार्यकर्ते ॲड संदिप कुलकर्णी अशोक बॅंकेचे व्यवस्थापक गणेश कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथमेश जोशी , महेश तारगे प्रा. विनायक कुलकर्णी, पंकज देशमुख सौ व श्री वैभव गायकवाड संत गंगागिरी महाराज भजनी मंडळाचे अशोक देसाई, सुधाकर राऊत, गंगा गोसावी, नागेश सुगुर , भाऊसाहेब औताडे आदीसह भजनी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
सोहळा यशस्वीतेसाठी बापूसाहेब पिटेकर,अभिनव कुलकर्णी मोहित राऊत, वरद कुलकर्णी , विशाल मोरकर , सचिन रोकडे, सचिन कुलकर्णी, वेदांत कुलकर्णी आदिसह रेणुका उपासना परिवाराचे व सद्गुरू सेवा मंडळाच्या सर्व साधकांनी परिश्रम घेतले. सोहळ्यास सद्गुरू बाबांचा शिष्य परिवार व पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment