श्रीरामपूर : राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने कर सहाय्यक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत येथील अक्षय सुरेश घाणे या युवकाची निवड झाली आहे.
अक्षयचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण जे. टी. एस. विद्या संकुलात झाले आहे.तसेच पुढील बी. टेक. इलेक्ट्रॉनिक इंजिनीरिंगचे शिक्षण पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी येथून पुर्ण केले आहे.या सुयशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अक्षय घाणे यांची कर सहाय्यकपदी निवड







