शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

२३ वर्षांनंतर पुन्हा जुळले मैत्रीचे धागे; गुहाच्या प्रवरा माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

---Advertisement---

लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा माध्यमिक विद्यालय, गुहा (ता. राहुरी) येथील सन २००३ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच विद्यालय परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल २३ वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे बंध अधिक दृढ केले.या स्नेहमेळाव्यात आयटी, औषधनिर्माण, मेकॅनिकल, कृषी, विधी, शिक्षण, राजकारण, विपणन तसेच प्रगतशील शेती अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले सुमारे ३५ माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, सन २००३ मध्ये विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक तसेच सध्या कार्यरत असलेले शिक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.स्नेहमेळाव्यात विविध खेळ, गाणी, आठवणींचे क्षण आणि मनमोकळ्या गप्पांमुळे दिवसभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. केवळ आनंदोत्सवापुरता कार्यक्रम मर्यादित न ठेवता माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली. सर्वांच्या आर्थिक योगदानातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विद्यालयाला आर.ओ. जलशुद्धीकरण यंत्र भेट देण्यात आले. तसेच विद्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. मैत्रीचा उत्सव, गुरुजनांप्रती कृतज्ञता आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचे सुंदर दर्शन घडवणारा हा स्नेहमेळावा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण त्यांना त्यांच्या दारापर्यंत मिळावे या उद्देशाने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामीण भागामध्ये प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून सुविधा निर्माण केल्या याचा लाभ ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, आणि सामान्य जनतेच्या मुला मुलींना झाला. संस्था ही संस्कारक्षम शिक्षण देण्याबरोबरच जागतिक पातळीवर ती काम करत आहे. यासाठी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून बदलत्या काळाचा आढावा घेत नवनवीन सुविधा देण्याबरोबरच कौशल्य आधारित आणि संस्कारक्षम शिक्षण यांवर भर दिल्याने आज प्रवरेचा विद्यार्थी हा जागतिक पातळीवर पोहोचल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचेही यावेळी कौतुक केले.स्नेहमेळाव्याचे सूत्रसंचालन शीतल गोंधळे यांनी केले, तर प्रा. महेश चंद्रे यांनी आभार प्रदर्शन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment