शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

नेवासा नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ‘आपला दवाखाना’ मूलभूत सुविधांअभावी त्रस्त

---Advertisement---

नेवासा : नेवासा नगरपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या ‘आपला दवाखाना’ या आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचे समोर आले आहे. नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासण्या आणि औषधे उपलब्ध करून देणारा हा दवाखाना सध्या पाणी, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांनी वेढला गेला असून रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या दवाखान्यात विविध प्रकारच्या रक्त व मूत्र तपासण्या मोफत केल्या जातात. मात्र, या तपासण्यांसाठी आवश्यक असलेली स्वच्छ व कार्यरत स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. स्थानिक सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत अस्वच्छ असून नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे रुग्णांना युरीन सॅम्पल देणे कठीण जात असून, महिला रुग्णांसाठी ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.
दवाखान्याचे प्रमुख डॉक्टर शिवाजी गोरे यांनी नगरपंचायतीकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. दवाखान्यात पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नसल्यामुळे रुग्णांसह डॉक्टर व कर्मचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक तीव्र झाली आहे.
तसेच, दवाखान्याच्या परिसरात अनियंत्रित पार्किंगमुळे रुग्णांच्या येण्या-जाण्यात अडथळे निर्माण होत आहेत. रात्रीच्या वेळी काही नागरिक येथे बसून धूम्रपान करत असल्याने परिसर अस्वच्छ आणि असुरक्षित होत असल्याची तक्रार आहे. दवाखान्यात सफाई कर्मचारी व सुरक्षा रक्षक नसल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. या सर्व कारणांमुळे नर्स व इतर कर्मचारी यांना रात्री किंवा उशिरापर्यंत काम करणे कठीण जात आहे. परिणामी, रुग्णसेवेवरही परिणाम होत असल्याचे दिसून येते. नगरपंचायतीने तातडीने दखल घेऊन पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज मीटर, स्वच्छता व्यवस्था आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment