शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आगळावेगळा उपक्रम : कोपरगावात अंडर-15 टेबल टेनिस सिंगल्स (मुले) स्पर्धेचे आयोजन

---Advertisement---

कोपरगाव( गौरव डेंगळे): सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा क्रीडा उपक्रम राबविण्यात येत असून, शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे यांच्या पुढाकाराने अंडर-15 टेबल टेनिस सिंगल्स (मुले) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होणार असून स्पर्धा नॉकआउट पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.या स्पर्धेत सामने ११ गुणांच्या ५ सेट्समध्ये खेळवले जाणार आहेत. स्पर्धेसाठी प्रवेश फी २०० रुपये ठेवण्यात आली असून नोंदणीची अंतिम तारीख २० एप्रिल २०२६ आहे. सहभागी खेळाडूंनी आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे. तसेच १ जानेवारी २०११ ही जन्मतारीख कट-ऑफ म्हणून निश्चित करण्यात आली आहे.स्पर्धेतील विजेत्यास २१०० रुपये व ट्रॉफी, उपविजेत्यास ११०० रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास रुपये ५०० व चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यास रुपये ३०० पारितोषिक देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, सिद्धेश कपिले (कल्पतरू बिल्डर्स अँड डेवलपर्स) यांच्या सौजन्याने विजेता व उपविजेता खेळाडूंना नगद पारितोषिक देण्यात येणार आहे.उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राकडे वळविणे व त्यांच्यातील कौशल्यांना वाव देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील मुलांना टेबल टेनिस खेळाचा अधिक सराव व प्रोत्साहन मिळावे, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ही स्पर्धा एक सुवर्णसंधी ठरणार असून त्यांना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी गणेश मोरे(8830693100), विशाल आल्हाट,प्रसाद भास्कर,महेश मोरे व गणेश वाघ यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment