श्रीरामपूर – येथील सिंधी समाजाच्या वतीने 101 बहराणा साहेब चे कार्यक्रम सोमवार, दि. 18 मे रोजी बाफणा हॉल येथील पार्किंग ग्राऊंडवर संपन्न झाला. यावेळी 101 सिंधी समाजातील कुटुंबांनी एकत्र येऊन सामुहिकरित्या बहराणा साहेब ची पुजा अर्चना केली.यानिमित्त अहिल्यानगर चे सुप्रसिध्द गायक बल्लु सचदेव यांच्या मधुर आवाजात श्री झुलेलाल चालिसा तसेच भजन, किर्तन व भक्तीमय गीतांचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम 5.00 वा. सुरु होवून 8.30 वा. बाफणा हॉल ते झुलेलाल मंदीर, दशमेश चौक, वलेशा पथ या मार्गावरुन भव्य मिरवणूक काढून भैय्या गल्ली येथील कॅनॉलजवळ सर्व बहराणा साहेबांचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसाद बाफणा हॉल येथे झाला. यावेळी श्रीरामपूरचे आ.हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, राजश्रीताई ससाणे, सचिन गुजर, माजी नगरसेवक हेमा गुलाटी, रविंद्र गुलाटी, राजेश अलघ, नगरसेवक दिलीप नागरे, प्रशांत अलघ, नगरसेविका नवनितकौर सेठी आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाची सर्व तयारी यशस्वीतेसाठी श्री झुलेलाल मंदीर सेवादार समितीचे आशिष बठेजा, आनंद तलरेजा, संजय माखीजा, मनोज सहजानी, बन्सी फेरवाणी, विजेश ठकराल, जितु चुग, लखन आछडा, दिपक गुलवाणी, जयकिशन तलरेजा, विकी बत्रा, चंदन बालाणी, चेतन लुल्ला, दिनेश तलरेजा, कैलास चुग, शुभम आछडा, मंगेश छतवाणी , किशोर छतवाणी मित चुग, तन्मय लुल्ला, अनिमेश फेरवाणी, आकाश माखीजा, भारत ताराणी, जवाहर कुकरेजा, विजय चुग तसेच श्री झुलेलाल विकास मंडळाचे अशोक भागवाणी, संतोष बत्रा, प्रकाश चुग, नरेश वलेशा, गिरधारीलाल आछडा, भजनलाल तलरेजा व सिंधी समाजाच्या वतीने परिश्रम करण्यात आले.
सिंधी समाजाच्या वतीने सामुहिक 101बहराणा साहेबचे विशाल कार्यक्रम संपन्न







