लोणी : राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे कृषी महाविद्यालय ,लोणी येथील कृषीकन्यांचे आगमन झाले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी या कृषीकन्यांचे स्वागत केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय, लोणी येथे या विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेने संस्थेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी डाॅ.सुस्मिता विखे पाटील आणि कृषी शिक्षण संचालक डॉ. उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषी महाविद्यालय लोणीचे प्राचार्य डाॅ. अमोल खडके , कार्यक्रम समन्वयक डॉ. रमेश जाधव, कार्यक्रम अधिकारी डॉ. विक्रम अनाप आणि प्रा. अक्षया वाळुंज यांच्या सूचनेनुसार कृषीकन्या श्रद्धा सावंत, दिशा विखे, मेरगळ गौरी मेरगळ, निलम रोडे, कोमल गावडे हे सोनगाव येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी ग्रामपंचायत सोनगावच्या सरपंच सौ. अलकाताई शिंदे,उपसरपंच एजाज तांबोळी, ग्रामविकास अधिकारी पटेल एच. वाय., ग्रामपंचायत कर्मचारी श्री. सिताराम शिंदे, ग्रामस्थ रोहिदास कानडे , विजय अनाप, विकास अनाप व इतर ग्रामस्थ यांनी स्वागत केले.
कृषी शिक्षणाच्या माध्यमातून ह्या कृषीकन्या येथील शेतकऱ्यांना सदर कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी ग्रामीण जीवन आणि कृषी तंत्रज्ञान, कीड व रोग ओळख, एकात्मिक व्यवस्थापन यांची माहिती शेतकऱ्यांनपर्यंत प्रात्यक्षिकाद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.
सोनगाव येथे प्रवरेच्या कृषीकन्यांचे आगमन











